अनिल देशमुखांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

मुंबईच्या उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना ईडी कोठडी दिली

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना अखेर १ नोव्हेंबर रोजी सोमवारी, रात्री १२:३० वाजता अटक करण्यात आली होती. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक झाली. मनी लॉन्ड्रिंगप्रकणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर मुंबईच्या उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना ईडी कोठडी दिली आहे. यामुळे अनिल देशमुख १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असणार आहे.

यापूर्वी ईडीकडून विशेष कोर्टाकडे १४ दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. शनिवारी ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख्यांच्या ९ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अनिल देशमुख यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीची कोठडी देण्याची मागणी फेटाळत देशमुख यांना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली. देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी असणार आहेत.

(हेही वाचा – ‘त्या’ पार्टीचे अस्लम शेख यांनाही निमंत्रण, तरीही ते गप्प का?)

१०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण भोवले

अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची बेकायदेशीर वसुली केल्याचा आरोप आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेखी पत्र देऊन हे आरोप केले होते. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून अनिल देशमुख यांना ५ जून रोजी पहिले समन्स पाठवले होते. मात्र त्यांनी वकिलामार्फत कारण पुढे करून ईडीकडून वेळ मागितला होता. मात्र देशमुख हे वेळ देऊनही ईडीच्या चौकशीला हजर झाले नव्हते. दरम्यान ईडीने एका पाठोपाठ एक असे चार महिन्यांत पाच समन्स देशमुख यांना पाठवले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here