‘हिंदूस्तानी भाऊ’ला उच्च न्यायालयानं फटकारलं! कारण काय?

178

उच्च न्यायालयाने सोमवारी विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्तानी भाऊ’ला फटकारले. यावेळी न्यायालयाने असे म्हटले की, तुम्ही विद्यार्थ्यांना का भडकवले, असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे, असेही सांगितले. ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप हिंदुस्थानी भाऊवर आहे.

विद्यार्थ्यांना का भडकवले? न्यायालयाचा सवाल

या प्रकरणी विशेष कार्यकारी दंडाधिकारम्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस विरोधात हिंदुस्थानी भाऊने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यानंतर सोमवारी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, हिंदुस्थानी भाऊच्या वकिलांनी खंडपीठाला प्रकरणाची माहिती दिली. तसेच हिंदुस्थानी भाऊला अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. त्यावर याचिकाकर्त्यांने विद्यार्थ्यांना का भडकवले. विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे आवाहन करणे चुकीचे असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – भिवंडी पीव्हीआर थिएटरची होणार चौकशी! विधानसभा अध्यक्षांनी काय दिला आदेश?)

याचिका दखल घेण्यायोग्य नाही

हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना एकत्र येण्यास सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे प्रभावित केले जाऊ शकते, अशा शब्दांत न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊच्या कृत्यावर ताशेरे ओढले. दरम्यान, नोटीसनुसार, हिंदुस्थानी भाऊ हा दंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाला असून त्याच्याकडून सार्वजनिक शांतता भंगांची शक्यता नाही याची खात्री पटली तर भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा केला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र त्याच्याकडून लिहून घेण्यात येईल. त्यामुळे त्याची याचिका दखल घेण्यायोग्य नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.