LPG गॅस सिलिंडरची बुकिंग करताय? ‘या’ अ‍ॅपवरून करा अन् मिळवा मोठं कॅशबॅक!

107

जर तुम्ही अद्याप गॅस बुकिंग केले नसेल आणि जर तुम्हाला गॅस सिलिंडर बुकिंग करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतात साधारण सर्वच घरात गॅस सिलिंडरचा वापर होतो. अशातच Paytm ने त्याच्या युजर्ससाठी एक ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस यापैकी कोणत्याही एलपीजी गॅस सिलिंडरचे बुकिंग करत असाल तर पेटीएम तुम्हाला कॅशबॅकची ऑफर देत आहे.

(हेही वाचा – LPG गॅस सिलिंडरवरील ‘या’ आकड्यांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? दडली आहे महत्त्वाची माहिती)

पेटीएम आपल्या युजर्सना पहिल्या गॅस सिलिंडर बुकिंगवर १५ रूपयांचा कॅशबॅक देत आहे. मात्र पेटीएम वॉलेटच्या माध्यमाने गॅस बुकिंग केल्यास तब्बल ५० रूपयांचा कॅशबॅक युजर्सना मिळणार आहे.दरम्यान, पेटीएम आपल्या यूजर्सना रजिस्टर्ड फोन नंबर आणि अ‍ॅडीशनल चार्जेसवर गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. विशेष म्हणजे पेटीएमच्या माध्यमाने युजर्स आपले बुकिंग ट्रॅकही करू शकतात. म्हणजेच आपण केव्हा गॅस सिलिंडर बुकिंग केले आणि आपले सिलिंडर कधी डिलिव्हर होईल, याची माहिती देखील या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे.

(हेही वाचा – तुम्हाला माहिती आहे का? LPG गॅस कनेक्शन सोबत मिळतो इतक्या लाखांचा विमा)

पेटीएमने मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी आपल्या युजर्ससाठी नवी कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. जर तुम्ही पेटीएमवरील नवे युजर असाल आणि पहिल्यांदाच गॅस सिलिंडर बुक करत असाल तर १५ रूपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी आपल्याला FirstGas कोड वापरावा लागेल. तसेच पेटीएम वॉलेटचा वापर केल्यास युजर्सनी Wallet 50 GAS कोड टाकल्यावरच युजर्सना बुकिंगवर ५० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

असं करा पेटीएमवरून सिलिंडर बुकिंग

  1. Paytm मध्ये जाऊन रिचार्ज आणि बिल पेमेंट कॅटेगिरीमध्ये ‘बुक गॅस सिलेंडर’ वर क्लिक करा.
  2. एलपीजी सिलिंडर सर्व्हिस प्रोव्हायडर सिलेक्ट करून नंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा १७ अंकांच्या एलपीजी आयडी नोंदवा.
  3. पेमेंट करून तुमच्या बुकिंगसह पुढे जा.
  4. तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यांसारख्या आपल्या पसंतीच्या पेमेंट सिस्टिमने पेमेंट करू शकतात.
  5. पेमेंट केल्यानंतर, आपली बुकिंग कंफर्म होईल. यानंतर तुमचे गॅस सिलिंडर २ ते ३ दिवसांत डिलिव्हर होईल, असे मेसेज दिला जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.