Star Air: नाशिककरांसाठी मोठी बातमी! नाशिक-बेळगाव विमानसेवा फेब्रुवारीपासून पुन्हा होणार सुरू!

114

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टार एअरने नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. येत्या ३ फेब्रुवारी २०२३ पासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाण योजनेंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांच्या आदेशानुसार, स्टार एअर बसने बेळगाव- नाशिक विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केली आहे, अशी माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली आहे.

(हेही वाचा – ITBP Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण आहात? दरमहा 69,000 पगाराच्या नोकरीची संधी)

जानेवारी २०२३ पासून नाशिक ते बेळगाव ही विमानसेवा सुरू होणे अपेक्षित होते मात्र कोरोना महामारीमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेंतर्गत कालावधी वाढवून विचाराधीन असल्याचे केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी पत्राद्वारे माहिती दिली होती. त्यानंतर आता ही विमानसेवा लवकरच नाशिककरांच्या सेवेत हजर होणार आहे. सद्यस्थितीत विमानतळ हे २० नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. दुरूस्तीचे काम सुरू असल्याने साधारण १३ दिवस हे काम चालणार आहे, त्यामुळे त्यानंतर ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय.

नाशिक विमानतळावरून उड्डाण योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवार आणि रविवारी नाशिक बेळगाव सुरू करणार आहे. त्यासाठी बुकिंग सुरू केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.