मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ST बस, ट्रक आणि सात गाड्यांचा विचित्र अपघात; दोन प्रवासी जखमी

मुंबई- पुणे महामार्गावर बोरघाटात नऊ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने नऊ वाहनांचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु दोन प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने येणा-या ट्रकचा ढेकू गावाच्या हद्दीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने नऊ वाहनांना धडक दिली.

भरधाव ट्रकने पुढे जाणा-या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने एसटी बस आणि इतर सात वाहनांना धडक दिली. यात एसटी बसला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने या अपघातात सुमारे दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.

महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावरील आयआरबी, देवतूत यंत्रणा यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. बोरघाट पोलिसांनीदेखील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

( हेही वाचा: कोकण रेल्वेची ‘तेजस एक्स्प्रेस’ १५ सप्टेंबरपासून विस्टाडोम कोचसह मडगावपर्यंत धावणार )

दोन प्रवासी जखमी

या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी कारमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले गुरुनाथ साठीलकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here