मुलगी पटत नाही म्हणून गड्याने लिहिले आमदारांना पत्र… म्हणाला प्रोत्साहन द्या

या पत्राचा विषय आहे- Girlfriend न पटण्याबाबत... आहे की नाही विषय खोल?

लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं, थेट जाऊन बोलण्यापेक्षा Easy आणि Better असतं… ही कविता तर आपल्या सगळ्यांनाच आवडते. स्वतःच्या पायावर उभे नसलो तरी चालतंय, पण प्रेमात पडायला सगळे एका पायावर तयार असतात. स्वप्नात सुद्धा ‘ती’ दिसली की धडधड वाढते आणि तितक्यात गजराची टीकटीक ऐकायला येते आणि गुलाबी स्वप्न भंग होतं. मग आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करावं आणि काय नाही, असं होतं. मग कोणी,

चंद्र, सूर्य आणि तारे, तू म्हणशील तिथे वाहतील वारे…

अशा चारेळ्या रचतं, कोणी छान गाणं म्हणून इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतं किंवा कोणी गुडघ्यावर बसून प्रपोज करतं… हे सगळे उपाय कसे रोमँटिक वाटतात. पण चंद्रपुरातील एका गड्याने अँटिकपणा केला आहे. आपल्याला पोरगी पटत नाही म्हणून त्याने थेट आपल्या मतदारसंघातील आमदाराला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आपली व्यथा मांडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात राहणा-या एका दिलजले तरुणाने आमदारांना पत्र लिहिले आहे.

या पत्राचा विषय आहे- Girlfriend न पटण्याबाबत… आहे की नाही विषय खोल?

काय आहे पत्रात?

महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही Girlfriend नसल्याने ही चिंतेची बाब आहे. यामुळे माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून, राजुरा-गडचांदूर येथे दररोज फेरी मारतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारू विकणा-यांना Girlfriend असते. हे बघून माझा जीव जळून राख होतो, अशा शब्दांत त्याने आपलं काळजातील वेदना कागदावर उतरवली आहे.

ही आहे मागणी?

तरी माझी विनंती आहे की विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे, की आमच्यासारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा, अशी विनंतीवजा मागणी या गड्याने आमदारांकडे केली आहे. त्यामुळे आता आपल्या मतदारसंघातील या तरुणाची मागणी आमदारसाहेब किती गांभीर्याने घेतात, याची त्या तरुणाइतकीच तुम्हाला देखील उत्सुकता आहे की नाही?

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here