प्रदर्शनाच्या दिवशीच का सुरू आहे ‘बॉयकॉट 83’ ट्विटर ट्रेंड?

127

रणवीर सिंगचा ’83’ हा चित्रपट 24 डिसेंबरला, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत असतानाच दुसरीकडे ट्विटरवर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. यासोबतच #Boycott83 देखील ट्विटरवर ट्रेंड करत आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहतेही चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहेत.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे समर्थन केल्यामुळे बहिष्कार

दीपिका पदुकोणने गेल्या वर्षी जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे समर्थन केल्यामुळे अनेकांनी दीपिका प्रती रोष व्यक्त केला होता. 83 चित्रपटावर बहिष्कार टाकणारे काही लोक म्हणतात की, ‘दीपिका तुकडे तुकडे गँगची समर्थक आहे.’ अशा परिस्थितीत दीपिकाने निर्मित केलेला चित्रपट बघू नये. लोकांचा दीपिकाविरुद्धचा राग अजूनही कमी झालेला नाही. यावेळी काही सोशल मीडिया यूजर्स रणवीर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्यावरही भडकले असून ते त्यांना फेक स्टार म्हणत आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे चाहते नाराज

‘बॉयकॉट 83’ हा हॅशटॅग शुक्रवारी सकाळपासूनच ट्विटरवर ट्रेंड करत आहे, ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी रणवीरला मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चिप्स टीव्हीसीमध्ये सुशांतची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोल करत संताप व्यक्त केला होता. सुशांतचे भौतिकशास्त्रावरील प्रेम सर्वश्रुत होते आणि रणवीरच्या जाहिरातीमुळे त्याचे काही चाहते नाराज झाले होते, जे त्यांना अपमानास्पद वाटले.

( हेही वाचा : कोरोना मृतांच्या यादीत तब्बल 216 लोकं जिवंत! वाचा संतापजनक प्रकार )

महत्त्वाची भूमिका

83 या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दीपिका पदुकोण त्यांची पत्नी रोमीची भूमिका साकारत आहे. याशिवाय ताहिर राज भसीन, जीवा सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, आदिनाथ कोठारे, हार्डी संधू आणि पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, मधु मंतेना, कबीर खान, दीपिका पदुकोण आणि साजिद नाडियादवाला यांनी संयुक्तपणे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.