boycott adipurush : ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा निर्माता घाबरला, प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे

155

श्रीराम, हनुमान आणि रावण यांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केल्यामुळे रामायणाचे विडंबन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये या चित्रपटाच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहीम boycott adipurush असा ट्रेंड सुरु झाला. त्यामुळे घाबरलेला या चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपट मे २०२३ ला प्रदर्शित होण्याची शक्यता 

‘आदिपुरुष’ हा चित्रपट मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन असे स्टार कलाकार असलेल्या या चित्रपटाला खूप विरोध झाल्यानंतर निर्माते त्याच्या व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्समध्ये बदल करत आहेत. तथापि, चित्रपट पुढे ढकलण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे चिरंजीवीचे ‘वॉल्टेअर वीराया’ आणि NBK चे (नंदकुमारी बालकृष्ण) ‘वीरा सिम्हा रेड्डी’ हे दोन मोठे दाक्षिणात्य चित्रपट संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. यामुळे आता हा चित्रपट 2023 च्या मे महिन्याच्या दरम्यान थिएटरमध्ये येऊ शकतो. मात्र, अद्याप या चित्रपटाच्या  प्रदर्शनाची नवी तारीख निर्मात्यांकडून घोषित करण्यात आली नाही.

(हेही वाचा Iran Anti-Hijab Protest : इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलनात तिसरा मुत्यू)

काय आहेत चित्रपटावरील आक्षेप? 

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज झाला होता. टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाला विरोध होत आहे. ‘आदिपुरुष’च्या टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्ट्स आणि दशानन बनलेल्या सैफ अली खानचा लूक लोकांना अजिबात आवडला नाही. सोशल मीडियावरही युजर्सनी रावणाचे ज्या प्रकारे टीझरमध्ये चित्रण दाखवले त्यावर आक्षेप घेतला होता. रावणाला शिवभक्त म्हणून पाहिले जाते, तर सैफ हा रावणाच्या लूकमध्ये खिलजी दिसतो आहे. सैफच्या लूकबद्दल प्रेक्षकांनी त्याला औरंगजेब, तैमूर, अल्लाउद्दीन खिलजी, बाबर, मोहम्मद गझनी आणि अनेक मुस्लिम आक्रमकांच्या नावांचे टॅगही दिले. सैफ रावणापेक्षा खिलजीसारखा दिसतो, असे लोक म्हणत आहेत. याशिवाय अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी 5 ऑक्टोबर 2022 रोजी सांगितले की, भगवान राम, हनुमान आणि रावण यांचे चित्रण महाकाव्यानुसार नाही. हा चित्रपट त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. यात हनुमान विना मिशी आणि दाढी असलेला दाखवला आहे, यावरही आक्षेप घेण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.