संघर्ष निरंतर जारी है अब पठाण कि बारी है! सोशल मीडियात ट्रेंड होतोय #BoycottPathan

158

शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. पठाण चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. सलमान खान, अमीर खान हे बहिष्काराच्या मोहिमेचे बळी गेल्यानंतर आता शाहरुख खान याची वेळ आली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख खान हा  मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मात्र आता BoycottPathan हा ट्रेंड सुरु झाला आहे. संघर्ष निरंतर जारी है अब पठाण कि बारी है असे सांगत  BoycottPathan असा ट्रेंड ट्विटरवर सुरु आहे.

टीझर रिलीज झाल्यापासून टीका 

ज्या दिवशीपासून पठाण चित्रपटाचे टीझर रिलीज झाले, त्याच दिवशीपासून सोशल मीडियावर ‘#BoycottPathaan’ हा ट्रेंड सुरू आहे. आता याचा फटका चित्रपटाला बसतो का, हे पाहवे लागणार आहे. सातत्याने युजर्स सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून अभिनेता शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे. पठाण चित्रपट हा हाॅलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे आणि या चित्रपटात काही वेगळे नसल्याचे देखील युजर्स म्हणत आहेत.

२५ जानेवारी २०२३ ला चित्रपट होणार रिलीज 

या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान दिसत होता. फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुखचा लूक कुल दिसत आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, मात्र आतापासूनच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जात आहे. यामुळे थेट बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.