तरुणीच्या हत्येप्रकरणी प्रियकराला अटक

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय तरुणीची तिच्याच मित्राने हत्या करून मृतदेह समुद्रात फेकल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी तिचा मित्र मोहम्मद शाहजेब अन्सारी याला अटक केली आहे. ही हत्या त्याने प्रेम प्रकरणातून केल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

गोरेगाव पश्चिम येथून मंगळवारी बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह गुरुवारी वर्सोवाच्या समुद्र किनारी आढळून आला होता. या तरुणीचे हातपाय इंटरनेटसाठी वापणाऱ्या वायरने बांधण्यात आले असून, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून होता. परंतु मृत तरुणीच्या कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. हा मृतदेह गोरेगाव येथून मंगळवारी बेपत्ता झालेल्या सोनम शुक्ला (१९) या तरुणीचा असल्याचे उघडकीस आले. गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर तिचे हात पाय बांधून मृतदेह समुद्रात टाकण्यात आला होता, असे प्राथमिक तपासावरून समोर आले आहे.

(हेही वाचाः बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला समुद्रात, मारेकरी कोण? मुंबईत उडाली खळबळ)

प्रेम प्रकरणातून हत्या

वर्सोवा पोलिसांनी हत्या, पुरावा नष्ट करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून तिचा प्रियकर मोहम्मद शहबेज अन्सारी (२३) याला अटक केली आहे. सोनम आणि मोहम्मद हे दोघे गोरेगाव प्रेमनगर या परिसरातच राहण्यास होते. पोलिसांनी मोहम्मद याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता, प्रेम प्रकरणातून त्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here