१८ वर्षांचा मुलगा आहे ना, ठेऊ द्या संबंध! उच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

128

टास्क फोर्सच्या अहवालानुसार अलिकडेच मुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे करण्यात आले. यावरून नव्या वादाला कारण मिळाले. अशातच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, कायद्यानुसार 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही तरुणाचे लग्न होऊ शकत नाही. पण विशेष बाबतीत, 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले जोडपे परस्पर संमतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये अर्थात लग्नाशिवाय दोन व्यक्ती परस्पर संमतीने एकत्र राहू शकतात, असा निकाल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.

तरुण जोडप्याच्या याचिकेवर निर्णय

गुरुदासपूर येथील एका तरुण जोडप्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी केली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडप्याने आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. दोन्ही याचिकाकर्त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे. मुलगा देखील 18 वर्षांचा आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार वयाच्या २१व्या वर्षापर्यंत तो लग्न करू शकत नाही. दोघांचा बचाव करताना त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, याचिकाकर्त्यांचे कुटुंबीय त्यांना मारतील, अशी भीती वाटत होती. त्यामुळे या जोडप्याने उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका दाखल केली.

( हेही वाचा : ई-चलनाची भानगड नको म्हणून लढवली जातेय भन्नाट शक्कल… )

पोलिसांना सुरक्षा पुरवण्याच्या सूचना

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे घटनात्मक दायित्वानुसार राज्याचे बंधनकारक कर्तव्य आहे. मुलगा हा विवाह योग्य वयाचा नसल्यामुळे याचिकाकर्त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने गुरदासपूरच्या पोलिसांना याचिकेनुसार या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.