आता ‘हिजाब जिहाद’ची सुरुवात? वाचा काय आहे षडयंत्र

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अल्पवयीन हिंदू मुलींना हिजाब परिधान करण्यासाठी जबरदस्ती केल्याची घटना नागपूर जिल्ह्यात समोर आली आहे. हे कृत्य करण्यासाठी बुरखेधारी महिलांचा एक गट रस्त्यावर उतरुन अल्पवयीन हिंदू मुलींना लक्ष्य करुन त्यांना हिजाब घालण्यास सांगत होता. या घटनेचा अनेक ठिकाणी हिंदू संघटनांनी विरोध आणि निषेध केला. परंतु असे असूनही अनेक ठिकाणी अल्पवयीन हिंदू मुलींचे ब्रेन वॉश करण्यात येत असल्याचे समोर आले.

(हेही वाचाः अल्पवयीन हिंदू मुलींचे होत आहे ब्रेन वॉश? पोलिसांनी दिले चौकशीचे आदेश)

असे आहे षडयंत्र

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आता ‘हिजाब जिहाद’ पसरवण्यासाठी मोठं षडयंत्र रचण्यात येत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारण्यात येत आहे. शनिवारी नागपुरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे किशोरवयीन हिंदू मुलींना घेरुन काही बुरखेधारी महिला हिजाब घालण्याची जबरदस्ती करत असल्याचा कोलाहल अनेक ठिकाणी ऐकू येत होता. हा प्रकार लक्षात येताच काही स्थानिकांनी त्यांना विरोध केला. अशीच एक घटना नागपूरमधील वॉकर्स स्ट्रीट येथे घडली. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात अशी जबरदस्ती करणा-या बुरखेधारी महिलांना काही हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिक विरोध करत असल्याचे दिसत आहे.

या संदर्भात बजरंग दलातर्फे स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीत बजरंग दलातर्फे काही मुस्लिम महिलांचा उल्लेख करण्यात आला असून, तसेच त्यांच्यासोबत असलेले पुरुष आणि गाडीचा नंबर देखील देण्यात आला आहे.

यासोबतच अशीच एक घटना याच वॉकर्स स्ट्रीटवर घडल्याचे एका मराठी डिजीटल पोर्टलवर देण्यात आलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. ज्यात एका अल्पवयीन हिंदू मुलीला बुरखा घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्याठिकाणी एका इस्लामिक संघटनेचे एक पत्र देखील मिळाले आहे. याबाबतची सत्यता अजूनही तपासण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here