व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी ब्रेकिंग न्यूज; आता नोटीफिकेशनमध्ये दिसणार फोटो आणि अनेक भन्नाट फिचर

सध्या मेसेजिंगसाठी व्हाॅट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येकाच्या जीवनातील व्हाॅट्सअॅप हे अविभाज्य घटक बनले आहे. अनेकांची कामे तर व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातूनच होतात. व्हाॅट्सअॅपही युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. असेच काही युझर फ्रेण्डली फीचर्स व्हाॅट्सअअॅपने आणले आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

असे असणार नवे फीचर

  • दोन जीबी पाठवता येणार

आतापर्यंत व्हाॅट्सअॅपवर केवळ 100 एमबीची फाइलच पाठवता येत होती. आता ही मर्यादा दोन जीबीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • 32 जणांना व्हाॅइस काॅल करता येणार

आतापर्यंत व्हाॅट्सअॅपवरुन आठ लोकांनाच व्हाॅइस काॅल करता येत होता. आता मात्र 32 जणांना वन टॅप व्हाॅइस काॅल करता येणार आहे.

( हेही वाचा: फेसबुक आणतेय हे भन्नाट नवे फिचर)

  • व्हाॅइस मेसेज पाॅझ व प्ले करता येईल

आधी रेकाॅर्डिंग करताना काही व्यत्यय आल्यास रेकाॅर्डिंग थांबवावे लागत असे. आता काही अडचण आल्यास पाॅझ बटन दाबून रेकाॅर्डिंग थांबवता येणार आहे. परत प्ले बटन दाबून रेकाॅर्डिंग पुढे सुरु करता येईल.तसेच मोठा मेसेज रेकाॅर्ड करण्यासाठी हॅंड फ्री मोडचा वापर करता येणार आहे. व्हाॅइस मेसेज पाठवण्यापूर्वी तो युझर स्वत: ऐकू शकेल. त्यानंतर व्हाॅईस मेसेज पाठवता येईल. व्हाॅइस मेसेज जिथे पाॅझ केला असेल तिथेच थांबेल. प्ले केल्यानंतर तिथूनच सुरु होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here