वर्षानुवर्ष देशात प्रसिद्ध असलेला पिण्याच्या पाण्याचा ब्रँड म्हणजे Bisleri… बिसलरी हा केवळ एक ब्रँड नाही, तर ती बाजारात मिळणा-या पाण्याच्या बाटलीची ओळख आहे. त्यामुळेच आपण तहान लागल्यावर दुकानदाराकडे पाण्याची बाटली नाही तर ‘बिसलरी द्या’, असंच म्हणतो.
छोट्या,मोठ्या ते अगदी 20 लिटरपर्यंतच्या बिसलरीने वर्षानुवर्ष शुद्ध पाणी देऊन लोकांची तहान भागवली. हीच बिसलरी कंपनी आता देशातील नामवंत असा टाटा उद्योग समूह विकत घेणार आहे. त्यासाठी 6 ते 7 हजार कोटी रुपयांचा करारही दोन्ही कंपन्यांमध्ये झाला आहे. पण बिसलरी कंपनी कोणाची आणि ती भारतात नेमकी कशी आली याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेऊया.
मलेरियावरचं औषध बनवणारी कंपनी
इटलीचे उद्योगपती फेलिस बिसलरी यांनी इटलीमध्ये आपल्या आडनावाने एक फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली, जी सुरुवातीला मलेरियाला पळवून लावणारं औषध बनवायची. फेलिस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिसलरीचा उद्योग वाढवला आणि तो भारतात देखील रुजवला.
(हेही वाचाः टाटा आता बिसलेरीला देखील विकत घेणार, लवकरच होणार अधिकृत करार)
भारतात बिसलरीची एंट्री
फेलिस यांनी पाणी विकण्याचा बनवलेला प्लॅन रॉसी यांनी 1969 मध्ये खुशरू संतूक या त्यांच्या मित्रासोबत भारतात सुरू केला. आता पाणी देणं म्हणजे पुण्यकर्म मानणा-या भारतात पाणी विकणं म्हणजेच त्यासाठी पैसे मोजणं हा त्यावेळी निव्वळ वेडेपणा होता. पण तरीही ठाण्यात बिसलरीचा पहिला प्लँट दिमाखात सुरू झाला.
काचेची बाटली ते प्लास्टिकची बाटली
सुरुवातीला बिसलरी बब्ली आणि बिसलरी स्टील या नावाने काचेच्या बाटल्यांमध्ये मिळत होती. 1984 मध्ये पारले कंपनीने बिसलरी विकत घेतली आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमधून बिसलरीची विक्री होऊ लागली. त्यानंतर 1995 मध्ये सध्याचे मालक रमेश चौहान यांनी केवळ 4 लाखांमध्ये बिसलरी ब्रॅंडची सूत्रं हातात घेतली आणि बिसलरीचा उद्योग वाढवला.
(हेही वाचाः सर्वसामांन्यांना बसू शकतो वीज दरवाढीचा ‘शॉक’, महिन्याच्या बिलात होऊ शकते इतक्या रुपयांची वाढ)
बिसलरीचा ताफा
सध्या बिसलरीच्या ताफ्यात 122 पेक्षा जास्त प्लॅंट, 5 हजाराहून अधिक ट्रक आणि साडेचार हजार पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. इतकंच नाही तर Thums Up, Limca हे कोल्डड्रिंकचे ब्रँड देखील आधी बिसलरीच्याच मालकीचे होते, पण 30 वर्षांपूर्वी ते कोका-कोलाला विकण्यात आले. आता आपला Packaged Drinking Water Brand सुद्धा बिसलरी टाटाला विकणार आहे.
वय झाल्यामुळे आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी कोणीही प्रभावी उत्तराधिकारी नसल्याने रमेश चौहान बिसलरी ब्रँड विकत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता टाटा उद्योगसमूह बिसलरीचं नाव बदलणार का?, असाही एक प्रश्न आहेच. पण मित्रांनो,,, नाम मे क्या है?,, बस ब्रँडही काफी है….
(हेही वाचाः येत्या 41 दिवसांत देशात होणार लाखो ‘शुभमंगलं’, खर्चाची यादी पाहून थक्कच व्हाल)
Join Our WhatsApp Community