भारतीय वंशाचे ‘हे’ लोक इतर देशांचे करतायेत नेतृत्व

136

भारतावर 150 वर्षे राज्य करणा-या ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर भारतीयाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये देखील महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती उद्धभवली आणि ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ब्रिटनचे पुढील पंतप्रधान कोण याच्या नावाची चर्चा सुरु झाली. यात एक प्रमुख नाव समोर येत आहे ते म्हणजे भारतीय वंशाचे ऋषी सुनक.

कोण आहेत ऋषी सुनक?

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी सुनक यांच्यासह पेनी माॅरडाॅन्ट, बेन वाॅलेस, साजिद वाजिद, लिज ट्रस आणि डोमिनिक राब यांची नावे चर्चेत आहेत. सुनक यांचे आई-वडील 1960 मध्ये ब्रिटनला गेले होते. 1980 साउथम्पैटनमध्ये सुनक यांचा जन्म झाला. वडील डाॅक्टर होते. ब्रिटेन विंचेस्टर काॅलेजमध्ये पाॅलिटीकल सायन्समधून पदवी घेतली. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून फिलाॅसाॅफी आणि इकाॅनाॅमिक्सचा अभ्यास केला. ते काही काळ गोल्डमैन सॅक्समध्ये काम करत होते. नंतर हेड फंड फर्म्समध्ये पार्टनर बनले. सुनक हे इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांनी नारायण मूर्तींची मुलगी अक्षता मुर्तीसोबत लग्न केले आहे. त्यांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुले आहेत. ऋषी सुनक यांच्यासारखेच भारतीय वंशाचे अनेक लोक इतर देशांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. त्या व्यक्तींविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

बलाढ्य देशाच्या उपराष्ट्राध्यक्ष – कमला हॅरिस

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणा-या त्या पहिल्या महिला आहेत. सोबतच उपाध्यक्षपदी असणा-या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियातल्या ऑकलॅंडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतातला, तर वडिलांचा जन्म जमैकामधला. हाॅर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले.

( हेही वाचा: ‘छत्री’ ही पावसापासून संरक्षणासाठी बनलीच नव्हती; वाचा छत्रीच्या उगमाचा रंजक इतिहास )

आयर्लंड देशाचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर

कोकणातील मालवणमधील वराड गावचे अशोक वराडकर यांचे चिरंजीव लिओ वराडकर. एक कोकणातला मुलगा आयर्लंड देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाला. लिओ वराडकर हे 2017 साली आयर्लंडचे पंतप्रधान झाले होते.

भरत अग्निहोत्री (आमदार कॅनडा )

भरत अग्निहोत्री हे भारतीय वंशाचे आहेत. ते कॅनडामध्ये आमदार आहेत.

ऑस्ट्रेलिया

  • दवे शर्मा- आमदार
  • लिसा सिंह- लेबर सिनेटर ऑफ तास्मानिआ

गुयाना ( country of South Africa)

  • इरफान अली- राष्ट्रपती (ऑगस्ट 2020)
  • छेडी जागरन – माजी पंतप्रधान

केन्या (Kenya)

  • सुंजीव बिर्दी- खासदार
  • अलीभाई जीवांजी- राजकारणी

मलेशिआ ( Malaysia)

  • टून महाथिर मोहम्मद- माजी पंतप्रधान
  • के. एस. निजहर- खासदार
  • कर्पाल सिंग- खासदार ( डेमोक्रेटीक एॅक्शन पार्टी)

न्यूझिलंड (New Zealand)

  • कनवलीजीत सिंह बक्शी- खासदार
  • परमजीत परमार- खासदार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.