ब्रिटन सरकार पुन्हा कोसळणार? ऋषी सुनक यांना संधीची शक्यता

133

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जवळपास 40 दिवसांतच लिझ टूस यांची खुर्ची धोक्यात आली आहे. पक्षांतर्गत बंडाचा आवाज तीव्र झाला असून, टूस यांना 24 ऑक्टोबरला पंतप्रधान पदावरुन हटवले जाऊ शकते. त्यांच्याविरोधात पक्षाचे 100 सदस्य लवकरच अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. त्यामुळे नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांचा दावा अधिक भक्कम झाला आहे.

पक्षाला वेगाने नेतृत्व बदलण्याची गरज आहे. टूस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, असे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे. टूस या पंतप्रधान म्हणून लोकांमध्ये आपली छाप सोडू शकल्या नाहीत, असा दावा त्यांचेच खासदार करत आहेत. सरकारचा मिनी अर्थसंकल्प सरकारलाच अडचणीचा ठरला आहे. त्यातून अर्थमंत्री क्वासी यांच्या हकालपट्टीने जनतेमध्ये आणखी चुकीचा संदेश गेला आहे.

( हेही वाचा: केदारनाथमध्ये हेलिकाॅप्टर कोसळून 6 जणांचा मृत्यू )

सट्टा बाजार सुनक यांच्या बाजूने

सट्टा बाजारानेही टूस सरकार कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. सरकार पडल्यास सुनक हे पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असे सट्टेबाजांचे मत आहे. सुनक हे सर्वांच्या पसंतीचे ठरत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.