सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज, शनिवारी पंजाबमधील पाकिस्तान बॉर्डरवर एक पाकिस्तानी ड्रोन पकडले. सदर ड्रोन चीनमध्ये निर्मीत असल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
भारताच्या हद्दीत ड्रोन आढळलं
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री जवळपास 11 वाजता बीएसएफ तुकडी 103 चे जवान अमरकोट भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना ड्रोनचा आवाज ऐकू आला, त्यांनंतर जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार सुरू केला व ड्रोन पाडण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून 300 मीटर अंतरावर भारताच्या हद्दीत हे ड्रोन पडल्याचे आढळून आले.
(हेही वाचा – लग्न समारंभासह इतर कार्यक्रम महापालिकेच्या रडारवर)
परिसरात शोध मोहीम सुरू
बीएसएफने पडकलेले हे ड्रोन हेरॉईन किंवा शस्त्रांची एखादी खेप भारतीय हद्दीत फेकून परतत असावे असा सुरक्षा दलाला संशय आहे. दरम्यान, हे ड्रोन ताब्यात घेण्यात आल्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू केली गेली आहे. पहिल्यांदाच पंजाबामध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आल्याची घटना घडली आहे.
Join Our WhatsApp Community