सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) पंजाब सीमेवर ३७ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. भारतीय हद्दीत गुरुवारी रात्री ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सतर्क जवानांनी गोळीबार करून ड्रोन केवळ परत पाठवले. तसेच त्यातून फेकलेले ३७ कोटी रुपयांचे हेरॉईनही जप्त केले.
(हेही वाचा – Mira Road Murder : माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर : लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक)
बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनने पुन्हा एकदा मध्यरात्री अमृतसर सीमेवर घुसखोरी केली आहे. पण सतर्क जवानांनी ड्रोनचा आवाज ओळखून गोळीबार सुरू केला. दरम्यान, ड्रोनने मोठे पॅकेट टाकल्याचा आवाज आला. ड्रोन परत गेला. त्यानंतर बीएसएफ जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. रात्रीच्या सुमारास परिसर सील करून शोधमोहीम राबविण्यात आली. अमृतसरच्या सीमेवरील राय गावच्या शेतात बीएसएफ जवानांना पिवळ्या रंगाचे एक मोठे पॅकेट सापडले आहे. हे पाकीट पिवळ्या टेपने झाकलेले होते. त्याला एक हुक देखील जोडलेला होता. ज्याद्वारे तो ड्रोनमधून फेकला जात होता. बीएसएफ जवानांनी पॅकेट उघडले असता त्यात ५ छोटी पाकिटे आढळून आली. वजन केले असता एकूण वजन ५.२५ किलो निघाले. ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे ३७ कोटी आहे.
पाकिस्तानी तस्करांकडून ड्रोनद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न सतत सुरुच आहे. नुकतेच अमृतसर सीमेवर ड्रोन पाडण्यात आले होते. तरनतारनमध्ये २.५ किलो हेरॉईनची खेप जप्त करण्यात आली आहे. त्याचवेळी माल नेण्यासाठी आलेल्या एका भारतीय तस्कराची मोटारसायकल देखील बीएसएफने जप्त केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community