अर्थ मंत्रालयातील प्रत्येक कर्मचारी अनेक दिवस अर्थसंकल्प बनवण्याच्या कामात गुंतलेला असतो. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी बरीच तयारी केली जाते. डेटा सुद्धा अतिशय बारकाईने तपासला जातो. संपूर्ण तयारी, तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरचं अर्थसंकल्पाची छपाई आणि पॅकिंगचे काम केले जाते. यादरम्यान अतिशय गोपनीयता पाळावी लागते अर्थमंत्रालयातील कर्मचारीसुद्धा यासाठी अनेक दिवस मेहनत घेतात. अर्थसंकल्प तयार झाल्यावर या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जाते. भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभप्रसंगी प्रथम मिठाई खाणे चांगले मानले जाते. म्हणूनच हलवा खाऊ घालून या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केले जाते. देशात ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे.
( हेही वाचा : Budget 2023 : तंत्रज्ञान क्षेत्राला अर्थसंकल्पातून काय मिळणार? बजेटकडे देशाचे लागले लक्ष)
हलवा समारंभ कुठे आयोजित केला जातो?
राजधानी दिल्लीच्या सचिवालय इमारतीच्या नॉर्थ ब्लॉक तळघरातील वित्त मंत्रालायच्या मुख्यालयात हलवा समारंभ आयोजित केला जातो. या समारंभात राज्यमंत्री आणि मंत्रालयाचे इतर उच्च अधिकारी उपस्थित असतात. अर्थसंकल्पाची कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यालयातच त्यांच्या कुटुंबियांपासून दूर रहावे लागत आहे. तसेच प्रिंटिंग कर्मचाऱ्यांना किमान काही आठवडे प्रिटिंग प्रेसमध्ये वेगळे रहावे लागते.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रुवारी २०२३ रोजी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.