राज्यातील सर्वच महापालिकांमधील कामकाज ठप्प! बांधकाम परवाने देणारी ‘ही’ वेबसाईट बंद

140

राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बांधकाम परवानग्यांसाठी महा आयटीने एक ऑनलाईन सिस्टीम तयार केली होती. ही बिल्डिंग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम (बीपीएमएस ) गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत. तर एकट्या औरंगाबाद महापालिकेत गेल्या सहा दिवसांत ५० हून अधिक बांधकाम परवानग्या रखडल्याची माहितीही समोर येत आहे.

यापूर्वी महापालिका आणि नगरपालिकांमधून मिळणारी बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीने दिली जात होती. मात्र नागरिकांना बांधकाम परवानगी वेळेत मिळावी या हेतूने ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. त्याकरता बीपीएमएस वेबसाइट (https://www.mahavastu.maharashtra.gov.in) नगरविकास विभागाने १ एप्रिल २०२२ पासून सुरू केली.

(हेही वाचा – शिंदे गटाचा ‘हा’ नेता लढवणार नाही 2024 ची निवडणूक; गोपीचंद पडळकरांचा गौप्यस्फोट)

नगरविकास विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या वेबसाईटमध्ये काही त्रुटी आढळून येत आहे. तर साईटमधील त्रुटी काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. पण या त्रुटी काही दूर झाल्या नाहीत, मात्र २१ डिसेंबरपासून बीपीएमएस वेबसाइट बंद पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आर्किटेक्टकडून बांधकाम परवानग्या अपलोड होणे बंद झाले आहे.

या अडचणींचा करावा लागतोय सामना

दरम्यान, बीपीएमएस वेबसाईट बंद पडल्याने राज्यभरातील बांधकाम परवानगी देणारी यंत्रणा कोलमडून पडली आहे. यामुळे राज्यातील मनपा आणि नगरपालिकांमधील अभियंते, सहायक कर्मचारी, अभियंते, उपअभियंते, कार्यकारी अभियंते यांचे ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्याचे काम ठप्प झाले आहे. बीपीएमएस वेबसाईट बंद पडल्याने वेबसाईटवर बांधकाम परवानगीची संचिका अपलोड करताना अनेक अडचणी येत होत्या, जसे की, वेबसाईट स्लो चालणे, नेटवर्क न मिळणे, बांधकामाचे मोठे ड्रॉइंग अपलोड न होणे, वारंवार वेबसाईट हँग होणे अशा तक्रारी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.