Om Banna Temple : इथे होते चक्क ’बुलेट’ ची पूजा! जाणून घ्या काय आहे बुलेट बाबांचा चमत्कार?

पोलिसांनी ही मोटारसायकल पुन्हा पोलिस ठाण्यात आणली. मग त्यांनी पेट्रोल काढले आणि साखळीला कुलूप लावून ठेवले आणि आश्चर्य! तरीही बुलेट दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी दिसली.

128
Om Banna Temple : इथे होते चक्क ’बुलेट’ ची पूजा! जाणून घ्या काय आहे बुलेट बाबांचा चमत्कार?

भारत हा एक अध्यात्मिक देश आहे तसा तो गूढ देश देखील आहे. गुढ अशासाठी की इथे गूढ विद्या अस्तित्वात आहेच, त्याचबरोबर असा अनेक गूढ गोष्टी इथे घडत असतात की त्याचं उत्तर देता येत नाही. पण त्या गोष्टी आहेत हे मात्र जाणवत राहतं. आज आम्ही अशा एका गूढ मंदिराबाबत तुम्हाला सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला ओम बन्ना मंदिराबद्दल (Om Banna Temple) माहिती देणार आहोत. या मंदिराला बुलेट बाबा मंदिर (Bullet Baba Mandir) सुद्धा म्हणतात. या मंदिरात मूर्ती नसून चक्क बुलेटची पूजा केली जाते. २०-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या मंदिराच्या ठिकाणी दुचाकीचा भीषण अपघात झाला होता, त्यात स्थानिक नेते ओमसिंग राठोड जागीच ठार झाले. (Om Banna Temple)

ही कथा आहे राजस्थानमधील जोधपूर येथील. २३ डिसेंबर १९८८ रोजी ओमसिंग राठोड नावाचा २३ वर्षांचा तरुण पाली येथील त्याच्या सासरहून संदेराव मार्गे चोटीला या गावी येत होता. त्यानंतर त्याच्या बुलेटचा अपघात झाला आणि त्याची बुलेट झाडावर आदळली. ओम बन्ना या स्थानिक नेत्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर काही विचित्र घटना घडू लागल्या. दररोज कोणत्या ना कोणत्या वाहनाचा अपघात होऊ लागला. ओमसिंग राठोड यांचा ज्या झाडाजवळ अपघात झाला होता, त्याच ठिकाणी अनेक वाहने गूढपणे आदळली असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. (Om Banna Temple)

ओमसिंग राठोड हे रॉयल एनफिल्ड ३५० सीसी बाईक चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ही दुचाकी पोलीस ठाण्यात नेली. दुसऱ्या दिवशी तेथून दुचाकी गायब झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता अपघात झाला त्याच ठिकाणी दुचाकी आढळून आली. पोलिसांनी ही मोटारसायकल पुन्हा पोलिस ठाण्यात आणली. मग त्यांनी पेट्रोल काढले आणि साखळीला कुलूप लावून ठेवले आणि आश्चर्य! तरीही बुलेट दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच ठिकाणी दिसली. (Om Banna Temple)

(हेही वाचा – Ind vs Eng 5th Test : के एल राहुल पाचव्या कसोटीत खेळणार की नाही?)

असा बसला लोकांचा या मंदिरावर विश्वास

आता मात्र गावकर्‍यांची झोप उडाली. ही घटना सामान्य नाही. ओमसिंग राठोड यांचा आत्माच हे सगळं करतोय असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला. मग गावकर्‍यांनी ओम बन्ना यांचे मंदिर (Om Banna Temple) बांधले आणि बाईकची पूजा करण्यास सुरुवात केली. म्हणूनच या मंदिराला बुलेट बाबा मंदिर असेही म्हणतात. लोकांचा असा विश्वास आहे की जो कोणी या मंदिरात येऊन (Om Banna Temple) ओम बन्ना यांचा आशीर्वाद घेतो, त्याच्या आयुष्यात कधीही कोणतीही जीवघेणी दुर्घटना घडत नाही. लोक तर असेही म्हणतात की त्यांचा आत्मा अपघातापासून वाहनांचे रक्षण करते आणि वाहनचालकांना अपघाताबाबत इशारा देते. (Om Banna Temple)

जोधपूरपासून ५० किमी आणि पालीपासून २० किमी अंतरावर असलेले हे मंदिर गावकरी आणि भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. इथून येणारे जाणारे लोक हमखास बुलेट बाबांचा आशीर्वाद घेतात आणि आपल्याला मार्गाला लागतात. तुम्हीही या अद्भुत मंदिराला आवर्जून भेट दिली पाहिजे. (Om Banna Temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.