वादग्रस्त ‘बुल्ली अ‍ॅप’ चे बंगळुरू ते उत्तराखंड कनेक्शन

मुस्लिम प्रतिष्ठित महिलांचे छायचित्रे त्याच्या सोशल मीडियावरून काढून ते छायाचित्रे ‘बुल्ली अ‍ॅप’ वर टाकून त्याची बोली लावण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वादग्रस्त अ‍ॅपचे कनेक्शन बंगळुरू ते उत्तराखंड असल्याचे समोर आले असून मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून एका सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याला आणि उत्तराखंड येथून एका महिलेला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला यातील सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुस्लिम समुदायामध्ये संतापाचे वातावरण पसरले

दिल्ली येथील प्रतिष्ठित घराण्यातील मुस्लिम महिलांच्या छायाचित्राची त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चोरी करून हे छायाचित्रात फेर बदल करून ते बुल्ली अ‍ॅप या वादग्रस्त अ‍ॅप वर टाकून या छायाचित्राची बोली लावली जात असल्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या वादग्रस्त अ‍ॅपचे लोण मुंबईत पोहचताच मुस्लिम समुदायामध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. दरम्यान मुंबईत काही दिवसापूर्वीच याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्ह शाखेत हा गुन्हा दाखल होताच, सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून बंगळूरु येथून एकाची माहिती काढण्यात आली. विशाल कुमार झा (२१) हा तरुण बंगळुरू येथून या वादग्रस्त अ‍ॅप चे काही खाते सांभाळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक बंगळुरू येथे दाखल झाली होती, सोमवारी विशाल कुमार झा याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीत पोलिसांना उत्तराखंड येथील एका महिलेचे नाव समोर आले होते.

(हेही वाचा कॉर्डिलिया क्रूझ या कारणामुळे पुन्हा चर्चेत!)

उत्तराखंडात मंगळवारी या महिलेला ताब्यात

सायबर गुन्हे शाखेची दुसरे पथक उत्तराखंड येथे पोहोचले, तेथून मंगळवारी या महिलेला ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनी उत्तराखंड येथील स्थानिक न्यायालयात या महिलेला हजर करून न्यायालयांकडून ट्रान्झिस्ट रिमांड घेऊन पोलिस पथक या महिलेसह मुंबईकडे रवाना झाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याला पोलिसांनी बंगळूरू येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. दोघे या प्रकरणातील सहआरोपी असून एकमेकांना ओळखतात, ते फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्र आहेत. ही महिला बुल्ली बाई अ‍ॅप या वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित तीन खाती हाताळत होती. सहआरोपी विशाल कुमार झा खालसा सुप्रिमिस्ट नावाने खाते उघडले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here