J&K: बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी CRPF कॅम्पवर फेकला बॉम्ब , व्हिडिओ व्हायरल !

122

जम्मू-काश्मीरमधील सोपोर शहरात सीआरपीएफ कॅम्पवर 29 मार्च रोजी संध्याकाळी बुरखा घातलेल्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सोशल मीडियावर या बाॅम्ब हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला एक दहशतवादी सीआरपीएफच्या चौकीवर बॉम्ब फेकताना दिसत आहे.

बाॅम्ब फेकून  काढला पळ

या व्हिडीओमध्ये बुरखा घातलेला अज्ञात दहशतवादी रस्त्यावर आला. त्याने आपल्या बॅगेतून बॉम्ब काढला आणि तो सीआरपीएफ कॅम्पवर फेकला. बॉम्ब फेकल्यानंतर दहशतवाद्याने घटनास्थळावरून पळ काढला. जेव्हा दहशतवाद्याने कॅम्पवर बॉम्ब फेकला तेव्हा काही दुचाकीही तिथून जाताना दिसल्या. तेथे उपस्थित लोकांनी पेट्रोल बॉम्ब टाकल्याने लागलेली आग पाण्याने विझवली, मात्र तोपर्यंत कॅम्प पूर्णपणे जळून खाक झाला होता. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही. सुरक्षा दल दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

( हेही वाचा: नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच ? मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र )

दोन दहशतवादी ठार

29 मार्च रोजी उशिरा श्रीनगरच्या रैनावरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.