मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एका सहलीच्या बसला बोरघाटात अपघात झाला. खोपोलीमध्ये विद्यार्थी असलेल्या एका लक्झरी बसला हा भीषण अपघात झाला असून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३५ विद्यार्थी जखमी झालेत. हा अपघात रविवारी झाला. मुंबईतील चेंबूरमधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथून परत येत असताना हा अपघात झाला. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीतील रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. दरम्यान, बस चालक चैतू ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – ‘…दाढी वाढवून कोणी मोदी होत नाही’; पूनम महाजनांंचं राहुल गांधींवर टीकास्त्र)
कसा झाला अपघात?
खोपोली हद्दीमध्ये हा अपघात झाला असून ही बस खासगी क्लासेसचे विद्यार्थी घेऊन जात होती. त्यामध्ये 48 विद्यार्थी होते. त्यापैकी 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात रविवारी, 11 डिसेंबर रोजी रात्री 8.30 वाजता झाला.
रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही बस मुंबईच्या दिशेने येत होती, त्यावेळी बसच्या वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटली. या भीषण अपघातानंतर त्वरीत बचावकार्य सुरु करण्यात आले होते. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी खोपोलीतील वेट अॅण्ड जॉयला आले होते. चेंबूर येथे परतत असताना हा अपघात झाला आहे
Join Our WhatsApp Community