दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये बस आणि ट्रकचा अपघात; 4 जणांचा मृत्यू तर 20 जखमी

92

दौंड तालुक्यातील भांडगावमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणा-या मार्गावर बस ट्रकला धडकली आहे. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून 50 प्रवासी प्रवास करत होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन सोलापूरहून पुण्याकडे ही लक्झरी बस निघाली होती. बसचे अचानक टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मोठ्या ट्रकला ही बस जाऊन धडकली. या अपघातात बसची एक बाजू चक्काचूर झाली आहे. अपघातात जखमींना नजीकच्या केडगावमधील हाॅस्पिटमध्ये तसेच पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा: 2023 चा अर्थसंकल्प बनवण्यासाठी ‘या’ पाच जणांनी केली अर्थमंत्र्यांना मदत )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.