37 ITBP जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली! पहलगाममध्ये भीषण अपघात, 6 जवान हुतात्मा

150

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या 37 जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 6 जवान हुतात्मा झाले असून अनेक जवान गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

(हेही वाचा – अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार? सोमय्यांनी ट्वीट करत म्हटले…)

सर्व जखमींवर पहलगाम आणि अनंतनाग येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी जवानांना श्रीनगरला नेण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 37 ITBP जवान आणि दोन पोलिसांना घेऊन जाणारी बस चंदनवाडी आणि पहलगाम दरम्यान खोल दरीत पडली असून हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेसाठी आयटीबीपीचे हे जवान तैनात करण्यात आले होते.

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, ते पहलगामपासून 16 किमी अंतरावर आहे, हे ठिकाण अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू मानले जाते. अपघातात बळी पडलेले हे जवान अमरमथ यात्रेची ड्युटी संपवून परतत होते. तर असेही सांगितले जात आहे की, ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जवानांनी भरलेली बस पलटी होऊन थेट दरीत कोसळली, अनेक फूट खोल दरीत पडल्याने बसचा चक्काचूर झाला आहे. मात्र, त्यामागे कोणते षडयंत्र आहे, याचाही तपास गुप्तचर विभाग करत आहे.

बघा व्हिडिओ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.