बर्निंग बसचा थरार! ३५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने अचानक घेतला पेट

165

मुंबईहून इचलकरंजीला जाणाऱ्या खासगी बसला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अचानक आग लागली. या बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ वराडे परिसरात ही घटना घडली. महामार्ग कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला आणि ३५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

( हेही वाचा : FIFA Final : अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स! LIVE अंतिम सामना कुठे पाहणार, किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या सर्व काही…)

संजय ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून इचलकरंजीला जात होती. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. कराड तालुक्यातील वराडे गावच्या परिसरात या बसच्या टायरने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण बसला आग लागली. बसने पेट घेतल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि महामार्ग देखभाल कर्मचारी दाखल झाले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कराड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली यानंतर अग्निशमन दलाने बसला लागलेली आग विझवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.