हॉक्स कॉलरच्या निशाण्यावर उद्योगपती आणि बॉलिवूड सुपरस्टार

मुंबईतील हॉटेल, शाळा गर्दीचे ठिकाणे आतापर्यंत हॉक्स कॉलरच्या निशाण्यावर राहिलेली आहे. आता या निनावी हॉक्स कॉलरकडून थेट उद्योगपती आणि बॉलिवूड सुपरस्टार यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी एका अज्ञात कॉलरने ११२ क्रमांकांवर (इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम) कॉल करून उद्योगपती, मुकेश अंबानी, सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके पेरले असल्याचा धमकीचा कॉल करून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे.

हा निनावी कॉल नागपूरच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमच्या ११२ क्रमांकावर करण्यात आल्यानंतर नागपूर पोलिसांना कळविण्यात आले. कॉल करणारी व्यक्ती मुंबईतील असल्यामुळे नागपूर पोलिसांनी या निनावी कॉल बाबत मुंबई पोलिसांना सतर्क केले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीमचे राज्यात नागपूर आणि नवी मुंबई या ठिकाणी नियंत्रण कक्ष आहेत. नवी मुंबईचे नियंत्रण कक्ष व्यस्त असल्यामुळे हा कॉल नागपूरच्या नियंत्रण कक्षाला वळवला गेला.

इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम नागपूर या ठिकाणी कॉल रिसिव्ह करण्यात आला असता अज्ञात कॉलरने आपले नाव न कळवता उद्योगपती मुकेश अंबानी, बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके पेरण्यात आली आहेत, तसेच दहशतवादी हल्ले करण्यासाठी २५ जण शस्त्रांनी सुसज्ज होऊन मुंबईतील दादरला पोहोचले असल्याचा दावाही कॉलरने केला आहे.

( हेही वाचा: मिशन चांद्रयान ३! इस्रोकडून मुख्य इंजिनची यशस्वी चाचणी )

या कॉलची दखल घेत नागपूर पोलिसांना या कॉल संदर्भात कळविण्यात आले. नागपूर पोलिसांनी कॉल तपासले असता हा कॉल मुंबईतून करण्यात आला असल्याचे समोर आले असून, नागपूर पोलिसांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळवले असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलीसांकडून तत्काळ धमकी देण्यात आलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली असून शहरात नाकाबंदी वाढविण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here