उद्योजक प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक

94
गोरेगाव येथील भूखंड विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी ईडीने अटक केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातलगाचा या प्रकरणात प्रवीण राऊत यांचा काही आर्थिक व्यवहार झाला आहे का, याची चौकशी ईडीकडून केली जाणार असल्याचे समजते. एचडीआयएलमधील १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप प्रवीण राऊत यांच्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणातील ही पहिलीच अटक असून यात आणखी कुणाचा सहभाग आहे का, हे चौकशीत समोर येईल, असे ईडीच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

ईडीला सहकार्य करीत नसल्यामुळे अटक

गोरेगाव येथील भूखंड विक्रीत एफएसआयमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू होती. या प्रकरणात प्रवीण राऊत हे ईडीच्या लक्ष्यावर होते. मंगळवारी ईडीकडून राऊत यांच्या संबंधित काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. दरम्यान ईडीने प्रवीण राऊत यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले गेले होते, त्याठिकाणी त्याच्याकडे यासंबंधी कसून चौकशी सुरू होती, परंतु राऊत हे ईडीला सहकार्य करीत नसल्यामुळे अखेर त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नातलगाचा प्रवीण राऊत यांच्याशी काही आर्थिक व्यवहार झाला आहे का याप्रकरणी  ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. प्रवीण राऊत यांना पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात फेब्रुवारी २०२१ मध्ये  ईडीकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ईडीकडून प्रवीण राऊत यांची ७० कोटीची मालमत्ता जप्त केली होती. राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यावरून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर सुमारे ५५ लाख रुपयांचा व्यवहार झाला होता याचा तपास ईडीकडून सुरू आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.