नागपुरात व्यावसायिकानं स्वतःसह आपल्या पत्नी, मुलाला कारमध्येच पेटवलं अन्…

आर्थिक विवंचनेने कंटाळलेल्या एका व्यक्तीने पत्नी आणि मुलासह कुटुंबासह गाडीतच स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरातून समोर आली आहे. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पत्नी आणि मुलगा यातून बचावले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागपूर शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली.

नागपुरात कुठे घडली ही घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, 58 वर्षीय रामराज गोपालकृष्ण भट असे मृताचे नाव आहे. त्यांची पत्नी संगीता भट आणि मुलगा नंदन गंभीर भाजल्याने त्यांना खापरी इथल्या स्वामी विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं थैमान! पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरीकांचे स्थलांतरण)

काय घडले प्रकरण

रामराज भट हे व्यावसायिक असून त्यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. ते विविध कंपन्यांना माल पुरवठा करायचे. कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान त्यांना मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे भट हे आर्थिक अडचणीत सापडले होते. यावेळी रामराज यांचा मुलगा नंदन याला त्यांनी काम करण्याची विनंती केली होती मात्र त्यांनी नकार दिला आणि ते अधिकच चिंतेत होते. त्यामुळे रामराज भट यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मृताच्या घरातून एक सुसाइड नोट सापडली

पोलिसांनी सांगितले की, रामराज कुटुंबाला जेवणासाठी वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. यावेळी त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवून पत्नी आणि मुलाला अॅसिडिटीच्या औषधाच्या नावावर विष पिण्यासाठी दिले. मात्र पत्नी, मुलाला याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील बाटलीतील द्रवपदार्थ तिघांवर फवारला आणि दोघांना हे कळण्यापूर्वीच त्यांनी कार पेटवून दिली. यामध्ये तिघेही भाजले परंतु रामराज भट यांता मृत्यू झाला. मृताच्या घरातून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी आर्थिक संकटामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here