सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग म्हणजे बेस्टचा प्रवास. खिशाला परवडणाऱ्या तिकिट दरामुळे प्रवासी इतर पर्याय बाजूला ठेवून बेस्टच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवास अधिकाधिक सुखकर होण्यासाठी बेस्ट सतत काही ना काही प्रयत्न करत असते. डिजिटल प्रवासाच्या दृष्टीने बेस्टने टाकलेले बेस्ट पाऊल म्हणजे ‘चलो’ अॅप. या अॅपमधून तिकिट खरेदी केल्यास तिकिटावर तब्बल ५० टक्के ते ६० टक्के सूट मिळणार आहे.
पाचपैकी एक जण लाभार्थी
प्रवासींचा आकडा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी ७ एप्रिलला बेस्टने पास दरात कपात केली. या कपातीमुळे बेस्टला मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. सध्या दिवसाला ३४ ते ३५ लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. यातील पाचपैकी फक्त एकच प्रवासी बेस्टमधून डिजिटल प्रवास करतो. वॉलेट, यूपीआय, क्रेडिट – डेबिट कार्ड आणि चलो अॅपद्वारे या डिजिटल तिकिटांची खरेदी केली जाते.
चार लाख प्रवाशांची पसंत
बसचा मार्ग, बसचे लाईव्ह लॉकेशन, बस स्टॉपची नावे या सगळ्या गोष्टी पूर्वी सहप्रवाशाला किंवा कंडक्टरला विचाराव्या लागायच्या. आता ते दिवस गेले आहेत. या सगळ्या गोष्टी घरबसल्या मोबाईलवर पाहाणे शक्य झाले आहे ते चलो अॅपमुळे.
अॅपवर ‘या’ ऑफरचा लाभ घेता येतो
वेलकम ऑफर
सुपर सेव्हस प्लॅन
स्टुडंट पास
अनलिमिटेड राई़ड पास
सिनियर सिटीझन सुपर सेव्हर प्लॅन
स्पेशल कन्सेशन पास
(हेही वाचा – BEST निर्णय! बसमधून प्रवास करताना मोठ्याने गाणी ऐकताय? आता ‘हे’ नियम पाळले नाहीतर पोलीस थेट करणार कारवाई!)
आतापर्यंत चार लाखांहून अधिक प्रवाशांनी वरीलपैकी एका पासची निवड केली आहे. यातल्या एका पासमुळे ६ रुपयांचे तिकिट चक्क दोन रुपयांना मिळत आहे.
६६ टक्के पर्यंतची बचत करायची आहे?
बेस्टच्या चलोमध्ये तिकिट खरेदी करण्याचा पर्याय आहे. यामुळे सुटे पैसे शोधण्याचा त्रास कमी होतो. मात्र पैशाची बचत होत नाही. त्यासाठी सात दिवसांपासून ८४ दिवसांपर्यंत असलेला एखादा पास विकत घ्यावा लागेल.
पास विकत घेण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा
गूगूल प्ले स्टोअर उघडा
चलो अॅप शोधा
लॉग इन करा
‘बस पास’ हा पर्याय निवडा
आवश्यकतेनुसार पासची निवड करा
यावर्षा अखेरपर्यंत सरासरी १० लाख प्रवाशांना डिजिटल प्रवासाकडे वळवण्याचे बेस्टचे ध्येय आहे. ई-तिकिट आणि पासवर मिळणारी सवलत बघता बेस्ट लवकरच हा आकडा गाठू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community