…आणि ‘दगडी चाळ’ बनली गवळीचे साम्राज्य!

दगडी चाळीतील रहिवाशांनी त्याचे प्राण वाचवल्यानंतर अरुण गवळी चाळकऱ्यांचा मसीहा बनला.

102

रमा नाईकच्या मृत्यूनंतर त्याच्या टोळीला अरुण गवळी शिवाय पर्याय नव्हता. रमा नाईकच्या हत्येनंतर गवळीने स्वतः नाईक टोळीची सूत्रे हाती घेऊन टोळी वाढवली. परळ, लालबाग मधील गिरणी कामगारांच्या बेरोजगार मुलांना त्याने आपल्या टोळीत सामील करुन घेतले. गवळीने दाऊदला मदत न करता स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यामुळे मुंबईत दाऊद विरुद्ध अरुण गवळी असा संघर्ष पेटला.

दाऊद-गवळी गॅंगवॉर पेटला

८०च्या दशकात हा संघर्ष सुरू असताना, दाऊदने अरुण गवळी याचा भाऊ बाप्पा गवळी याला ताब्यात घेतले. त्यानंतर संतापलेल्या अरुण गवळीने दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकर याची हत्या केली. त्यानंतर ख-या टोळी युद्धाला सुरुवात झाली. १९८४ साली गवळीने अमर नाईक याचा भाऊ अश्विन नाईक याच्यावर हल्ला केला. त्यात अश्विन नाईकला अर्धांगवायू झाला. कोब्रा गँगच्या शशी रासम आणि पारसनाथ पांडे यांच्या हत्येत अरुण गवळीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती.

(हेही वाचाः डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1))

दगडी चाळीचा ‘डॅडी’

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊद टोळी, अश्विन नाईक गॅंग आणि पोलिस अरुण गवळीचा शोध घेत असताना, अरुण गवळी हा दगडी चाळीत लपून बसला होता. तेथून दगडी चाळ ही प्रसिध्दी झोतात आली. अरुण गवळीला दगडी चाळीतील रहिवाशांनी लपवण्यासाठी मदत केली होती. तेथूनच अरुण गवळी दगडी चाळीचा ‘डॅडी’ म्हणून नावा रुपाला आला. दगडी चाळीतील रहिवाशांनी त्याचे प्राण वाचवल्यानंतर अरुण गवळी चाळकऱ्यांचा मसीहा बनला. दगडी चाळीतच आपण सुरक्षित राहू शकतो.

म्हणून गवळीने दगडी चाळीतच आपले साम्राज्य उभे केले.

(क्रमशः – 1983 साली दगडी चाळीत पहिल्यांदा रक्त सांडले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.