सी. एन. पटेल (C. N. Patel) यांचा जन्म २३ डिसेंबर १९१८ रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथील असरवा या गावात झाला. त्यांनी १९४० मध्ये इंग्रजी मेजर आणि संस्कृत मायनरमध्ये बीए पदवी प्राप्त केली आणि १९४४ मध्ये इंग्रजीत एमए पूर्ण केले. १९४४ ते १९६१ पर्यंत त्यांनी अहमदाबाद येथील गुजरात (Gujarat) कॉलेजमध्ये इंग्रजीचे लेक्चरर म्हणून काम केले.
(हेही वाचा – Virat Kohli Returns From SA : घरगुती कारणामुळे विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघारी)
तसेच १९५६-५७ दरम्यान त्यांनी वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे (Sardar Patel University) रजिस्ट्रार म्हणून काम केले. १९५९-१९६१ मध्ये अहमदाबाद येथील प्रकाश आर्ट्स कॉलेज फॉर गर्ल्सचे प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते लेखक, साहित्यिक समीक्षक आणि अनुवादक होते. गुजराती साहित्यातील (Gujarati literature) योगदानाबद्दल त्यांना २००० मध्ये रणजीतराम सुवर्ण चंद्रक मिळाले होते.
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांनाही रस्त्यावर पिटाळणार)
अभिक्रम हा त्यांचा पहिला साहित्यिक समीक्षणात्मक ग्रंथ होता. त्याचबरोबर साहित्यमा अने जीवनमा (jivan ma book in gujarati) आणि कथाबोध ही पुस्तके देखील त्यांनी लिहिली. गांधीजी नी सत्यसाधना आने बीजा लेखो, गांधीजी, अ गांधी रीडर, गांधीचरित ही त्यांची पुस्तके गांधीजींवर आधारित होती. विचारतरनाग, मॉरल अँड सोशल थिंकिंग इन मॉडर्न गुजरात, बुद्धिप्रकाश : स्वाध्याय आने सुची आणि मेरी विस्मयकथा ही त्यांची इतर पुस्तके आहेत. त्यांनी रामायणाचे गुजराती भाषांतर देखील केले आहे. (C. N. Patel)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community