सी. पी. कृष्णन नायर (C. P. Krishnan Nair) यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२२ साली केरळच्या उत्तर भागातील कन्नूर जिल्ह्यातील एका गावात झाला होता. त्यावेळी हे गाव ब्रिटीश राजवटीतील मद्रास प्रेसिडेन्सीच्या मलबार जिल्ह्यात होते. त्यांच्या वडिलांचे नाव अप्पू नायर असे होते. ते सरकारी बिल संग्राहक म्हणून काम करत होते आणि त्यांचे मासिक उत्पन्न रु. ९ एवढे होते. (C. P. Krishnan Nair)
नायर (C. P. Krishnan Nair) शाळेत असताना चिरक्कलच्या महाराजांनी त्यांच्या शाळेला भेट दिली होती. त्यावेळी नायर यांनी महाराजांच्या सन्मानार्थ स्वतः एक कविता लिहिली आणि महाराजांना वाचून दाखवली. त्यांच्या या कवितेने महाराज प्रभावित झाले आणि त्यांनी नायर यांना आजीवन शिष्यवृत्ती दिली. नायर वयाच्या १३व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. (C. P. Krishnan Nair)
१९४२ साली ते भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी ते बंगळुरूला गेले आणि अबोटाबाद (सध्या हा भाग पाकिस्तानात आहे) येथे वायरलेस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. तिथे ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले आणि नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या जवळच्या संपर्कात आले. पुढे पदोन्नती करत करत ते कॅप्टन या पदावर पोहोचले. (C. P. Krishnan Nair)
नायर यांनी या कंपनीची केली घोषणा
१९५१ साली नायर (C. P. Krishnan Nair) यांनी भारतीय सैन्यातून राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया हॅंडलुम बोर्डची स्थापना करण्यात योगदान दिले. युनायटेड स्टेट्स येथे हाताने कातलेल्या भारतीय धाग्याचे मार्केटिंग करण्यात त्यांनी त्या मंडळात मोठी भूमिका बजावली. युरोप आणि युनायटेड स्टेट्समध्ये सतत कराव्या लागणाऱ्या बिझनेस ट्रिप्सद्वारे नायर यांनी ॲडलॉन केम्पिंस्की, डॉर्चेस्टर सॅवॉय, जॉर्ज शान्व्हक आणि वॉल्डॉर्फ अस्टोरिया यांसारख्या आंतरराष्ट्रीय हॉटेलर्सशी संपर्क साधला. त्यामुळे त्यांना हॉटेल्स बिझनेसमध्ये उतरण्याची संधी मिळाली. (C. P. Krishnan Nair)
१९५८ साली त्यांनी ब्रूक ब्रदर्स यांच्यासोबत पार्टनरशिप करून ब्लीडिंग मद्रास फॅब्रिक या कंपनीची घोषणा केली. या कंपनीत नंतर टॉमी हिलफिगर, वॉल-मार्ट, लिझ क्लेबोर्न आणि मॅसी सारखे क्लायंट जोडले गेले. पुढे त्याच वर्षी त्यांनी सहार, मुंबई येथे लेस विणण्याचे एक युनिट सुरू केले. सी. पी. कृष्णन नायर (C. P. Krishnan Nair) यांनी १९५० साली उद्योगपती ए. के. नायर यांची मुलगी लीला यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांनी आपल्या हॉटेल्सचा बिझनेस त्यांच्याच नावाने सुरू केला होता. नायर दांपत्याला विवेक आणि दिनेश अशी दोन मुलं आहेत. त्यांपैकी विवेक नायर हे लीला ग्रुप्सचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत तर दिनेश नायर हे सह-अध्यक्ष आहेत. (C. P. Krishnan Nair)
(हेही वाचा – I Just Want Money : फेसबुकने काढून टाकलेला कर्मचारी आता कमावतोय वर्षाला २७ कोटी)
नायर यांनी या हॉटेलची केली स्थापना
नायर हे हॅंडलूम बोर्डचे अध्यक्ष असताना त्यांना वारंवार बिझनेस ट्रिप्स कराव्या लागत असत. अशाच एका ट्रिपदरम्यान बुडापेस्टमधील केम्पिंस्की हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. त्यावेळेस भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाची आलिशान हॉटेल्सची चेन सुरु करण्याची गरज आहे असे त्यांना वाटले. १९८१ साली सहार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याल्यानंतर नायर यांच्या लक्षात आले की अंधेरी, मुंबई उपनगर जेथे विमानतळ आहे, मात्र तेथे चांगले हॉटेल्स नाहीत म्हणून नायर (C. P. Krishnan Nair) यांनी १९८३ साली हॉटेल लीलाव्हेंचर लि. ची स्थापना केली. आणि सहार येथे विमानतळाच्या जवळपास त्यांच्या मालकीच्या ४ एकर जागेवर हॉटेल बांधण्यास सुरुवात केली आणि अतिरिक्त ६.५ एकर जमीन त्यांनी भाड्याने दिली. १९८७ साली मुंबईत पहिले लीला हॉटेल सुरू झाले. त्यानंतर लीला हॉटेल्स चेनमध्ये बंगळुरूमधील लीला पॅलेस, लीला गोवा आणि तिरुवनंतपुरममधील लीला बीच रिसॉर्ट यांचा समावेश होत गेला. सी. पी. कृष्णन नायर यांचे अल्पशा आजाराने १७ मे २०१४ साली मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. (C. P. Krishnan Nair)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community