चक्रवर्ती राजगोपालाचारी (C. Rajagopalachari) हे भारतीय कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी लेखक होते. ते राजाजी या नावानेही ओळखले जायचे. ते स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. १० एप्रिल १९५२ ते १३ एप्रिल १९५४ पर्यंत ते मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म दक्षिण भारतातील सेलम जिल्ह्यातील थोरापल्ली नावाच्या गावात १० डिसेंबर १८७८ रोजी झाला. (C. Rajagopalachari)
(हेही वाचा – Sharmila Tagore : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्ष शर्मिला टागोर)
राजाजींचे (C. Rajagopalachari) प्रारंभिक शिक्षण होसूर येथे झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण मद्रास (चेन्नई) आणि बंगलोर येथे झाले. १९३७ मधील परिषदेच्या निवडणुकीत मद्रास प्रांतात चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने (Congress) विजय मिळवला. त्यांना मद्रासचे मुख्यमंत्री करण्यात आले. १९३९ मध्ये ब्रिटीश सरकार आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील मतभेदांमुळे काँग्रेसची (Congress) सर्व सरकारे बरखास्त झाली. राजाजींनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. (C. Rajagopalachari)
त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले. काँग्रेस (Congress) आणि राजाजी यांच्यात वाद झाले. यावेळी ते गांधीजींच्या विरोधात उभे राहिले. या युद्धात इंग्रज सरकारला फक्त नैतिक पाठिंबा द्यायला हवा, अशी गांधीजींची भूमिका होती. तर राजाजींनी वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, “भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या अटीवर ब्रिटिश सरकारला सर्व प्रकारचा पाठिंबा दिला पाहिजे.” यावरुन महात्मा गांधी आणि राजाजी यांच्यातील मतभेद खूप वाढले. राजाजींनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. (C. Rajagopalachari)
(हेही वाचा – Dharmendra : हिंदी चित्रपटाचे रुपवंत आणि ‘ही-मॅन’ अभिनेते – धर्मेंद्र)
ते (C. Rajagopalachari) दक्षिण भारतातील काँग्रेसचे (Congress) प्रमुख नेते होते, परंतु नंतर ते काँग्रेसचे (Congress) कट्टर विरोधक बनले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यांनी दक्षिण भारतात हिंदीच्या प्रचारासाठी खूप काम केले. त्या काळी गांधींच्या विरोधात भूमिका घेण्याची कोणाची हिंमत नव्हती. राजाजी खरंच खूप धाडसी नेते होते. त्यांना भारतीय राजकारणातील चाणक्य म्हटले जायचे. त्यांना १९५४ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. भारतरत्न मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते. (C. Rajagopalachari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community