4G पेक्षा 5G महाग! ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री, कसे असतील मासिक दर?

147

केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंवाद विभागाचा स्पेक्ट्रम लिलावाचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे सर्वसामान्य जनतेला आणि उद्योगांना 5G सेवा पुरवण्यासाठी, या लिलावातील यशस्वी बोलीदाराना स्पेक्ट्रम वाटप केले जाणार आहे. त्यामुळे 4G पेक्षा 10 पट वेगाने इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यामुळे येत्या मार्च 2023 पासून भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रतिक्षा जरी संपली असली तरी सामान्यांच्या खिशावरील ताणदेखील वाढणार आहे.

(हेही वाचा – SSC Result 2022: निकालात मुलींची बाजी, कोकण सरस तर…राज्याचा एकूण निकाल किती?.)

कसे असतील मासिक दर?

5G इंटरनेटचे दर हे 4G च्या तुलनेत दहापटीने अधिक असणार आहे. 5G इंटरनेटचा मासिक रिचार्ज प्लान घेण्यासाठी ग्राहकांना 10 ते 40 टक्क्यापर्यंत अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5G इंटरनेटचे मासिक दर देखील खिशाला कात्री लावणारे असणार यात काही शंका नाही. सध्या दूरसंचार क्षेत्रातील अनेक कंपन्या या कर्जबाजारी झाल्या आहेत. तसेच 5G च्या महागड्या स्पेक्ट्रम खरेदीसाठी पैशांची गरज भासणार आहे. यामुळे 5G इंटरनेटचे दर 4G पेक्षा अधिक महाग असणार आहेत. स्पेक्ट्रमचे दर कमी करावेत, अशी मागणी देखील काही दिवसांपूर्वी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

कोणत्या शहरांमध्ये मिळणार सुविधा

भारतात मार्च 2023 पर्यंत 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या 61 हून अधिक देशात ग्राहकांना 5G ची सेवा देण्यात येत आहे. या देशांमध्ये लवकरच भारताचा देखील समावेश होणार आहे. देशातील पहिल्या टप्प्यात मुंबई, बंगळुरू, चेन्नई, चंदिगड, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता अशा प्रमुख 13 शहरात 5G सेवा सुरू होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.