ग्रामीण भागात पूर्वी किंवा काही शहरी भागात मुलीचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षीच लावले जात होते. त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षीच त्या मुलीवर सगळी जबाबदारी पडायची. मात्र आता मुलीच्या लग्नाच्या बाबतीत तिचे वय हे १८ वरून आता २१ वर्ष करण्यात येऊ शकते.
विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी
मुलीच्या लग्नाचं किमान वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सध्या हालचाली सुरु झाल्या आहेत. इतकेच नाही तर हे विधेयक यंदाच्या हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.
(हेही वाचा- बैलगाडा शर्यत होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं…)
विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता
मुलीच्या विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या या कायद्यात मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा १८ ठेवण्यात आली आहे. मुलीच्या लग्नाचे वय हे किमान १८ वरून २१ वर्ष करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केले आहे. त्यामुळे या संदर्भातील विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कायद्यात बदल करण्याच्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात लग्नाचं किमान वय १८ वरून २१ वर्षे करण्याची शिफारस केली होती.
Join Our WhatsApp Community