गणेशोत्सवामध्ये रेशनकार्डधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ वितरित केल्यानंतर आता महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय (Cabinet Decision) घेतला आहे. त्यानुसार, दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाईल. विशेष म्हणजे त्यात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेला कॅबिनेटने मंजुरी (Cabinet Decision) दिली. या योजनेंतर्गत दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यासह ४५ पदांनाही मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय (Cabinet Decision) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
सोयाबीन पिकांचे पंचनामे तातडीने करा – मुख्यमंत्री
– राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
– पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम,नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.
– नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत असे निर्देश देण्यात आले.
Join Our WhatsApp Communityहेही पहा-