कोलकाता विद्यापीठ (Kolkata University) हे भारतातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात या विद्यापीठाची स्थापना झाली होती. ब्रिटीश सरकारचे शिक्षण सचिव फ्रेडरिक जॉन यांनी लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर कोलकत्ता येथे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी लंडनमध्ये प्रथम प्रस्ताव दिला. जुलै १८५४ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांनी वुड्स डिस्पॅच म्हणून ओळखले जाणारे डिस्पॅच कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे येथे विद्यापीठे स्थापन करण्यासाठी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया इन कौन्सिलमध्ये पाठवले.
या विद्यापीठाची स्थापना २४ जानेवारी १८५७ रोजी झाली. भारतीय उपखंड आणि दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशातील सर्वात जुने बहुविद्याशाखीय विद्यापीठ (Kolkata University) म्हणून यास मान्यता मिळाली. या विद्यापीठाशी संलग्न कोलकाता आणि जवळपासच्या भागात १५१ अंडरग्रॅजुएट कॉलेज आणि १६ संस्था आहेत. हे भारतातले ५ स्टार विद्यापीठ असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC) द्वारे “ए” ग्रेड मान्यताप्राप्त आहे.
(हेही वाचा Mira Road Naya Nagar तपास यंत्रणेच्या रडारवर; डिसेंबर महिन्यात नया नगरमधून एका संशयिताला घेतलेले ताब्यात)
या विद्यापीठाचे (Kolkata University) अनेक माजी विद्यार्थी म्हणजे महनीय व्यक्ती आहेत. विद्यापीठाचे प्राध्यापक देखील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. अनेक राज्य आणि सरकारचे प्रमुख, समाजसुधारक, आघाडीचे कलाकार, रॉयल सोसायटीचे अनेक फेलो आणि नोबेल विजेते असे अनेक महान व्यक्तिमत्वांनी येथे शिक्षण घेतले आहे. आज हे विद्यापीठ भारताच्या प्रमुख आणि प्रशस्त विद्यापीठांपैकी एक आहे. नोबेल विजेते रोनाल्ड रॉस, रवींद्रनाथ टागोर, सी. व्ही. रमण, अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी असे अनेक दिग्गज कोलकाता विद्यापीठाशी संबंधित आहेत.
Join Our WhatsApp Community