दिल्ली येथून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन, यंत्रणा सतर्क

दिल्ली येथून पुण्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन अधिकाऱ्यांना करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. दिल्लीच्या आयजीआय विमानतळावरून हे विमान पुण्यासाठी रवाना होणार होते. धमकीच्या फोननंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानाचे बोर्डिंग तात्काळ रोखले आणि बॉम्बशोधक पथकाला बोलावण्यात आले.

( हेही वाचा : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताचा विजय; मालिका जिंकत मिशन वर्ल्डकपची सुरूवात)

दिल्ली पोलीस सतर्क

धमकीचा कॉल आल्यानंतर सीआयएसएप आणि दिल्ली पोलीस सतर्क झाले. दिल्ली विमानळतळावर सर्व विमानांची तपासणी करण्यात आली. परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना काहीही संशयास्पद आढळलेले नाही. पॅरामिलिट्री फोर्स CISF आणि दिल्ली पोलीस स्टॅंडबायवर आहेत.

सोमवारीही एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले 

याआधी ९ जानेवारी रोजी विमानात बॉम्ब असल्याचा कॉल आल्यानंतर विमानाचे एमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले होते. मॉस्कोवरून हे विमान गोव्याला जात होते. बॉम्ब असल्याचा कॉल आल्यानंतर फ्लाईटचे जामनगर विमानतळावर लॅंडिंग करण्यात आले होते. या विमानात २३६ प्रवासी होती परंतु काहीही संशयास्पद आढळले नव्हते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here