मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कोडवर्डमध्ये बोलत होता
सोमवारी, रात्री 10 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन करून धमकी दिली. विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू अशी धमकी या माथेफिरूने दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असे त्याचे नाव सांगितले. तो स्वत:ला इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत आहे. फोनवर धमकी दिल्यानंतर तो कोडवर्डमध्ये बोलत होता. त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली असून सर्व तपास यंत्रणांना याची माहिती दिली आहे. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सहारा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 505(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच! तुर्कीच्या मदतीसाठी जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला)
Join Our WhatsApp Community