फेरीवाल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ या पथविक्रेत्यांसाठीच्या विशेष सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची सप्टेंबर २०२२ या महिन्यात आतापर्यंत २४ विभागांमध्ये एकूण १०१ शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ६ हजार २४१ पथविक्रेत्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या पथविक्रेत्यांना योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली. यापुढेही अशा स्वरुपाच्या शिबिरांचे आयोजन विभाग स्तरावर नियमितपणे करण्यात येणार आहे, अशीही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याद्वारे (परवाना विभाग)देण्यात आली आहे.
केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (PM SVANidhi) अंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची मुंबईत  अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबईतील पथविक्रेत्यांना या योजनेची संपूर्ण माहिती व्हावी, त्याचबरोबर या योजनेमध्ये सहभाग नोंदविण्याची प्रक्रियादेखील माहिती व्हावी, या हेतुने महानगरपालिकेच्या सर्व म्हणजे २४ विभागांच्या स्तरावर माहिती व प्रात्यक्षिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे परवाना अधीक्षक यांनी दिली आहे.

( हेही वाचा: ‘मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून रचला कट’; तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप )

तरी या शिबिरामध्ये पथविक्रेत्यांनी सहभागी होऊन या योजनेची माहिती प्राप्त करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीकरीता विभागीय वरिष्ठ निरीक्षक (अतिक्रमण निर्मूलन) यांना संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे यानिमित्ताने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here