तिरंगा मास्क, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री! अवमान रोखण्यासाठी जनजागृती मोहीम

121

‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी राष्ट्रध्वजाचा वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. तरी अनुमती नसताना संकेतस्थळांद्वारे किंवा प्रत्यक्ष जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज किंवा तिरंगा मास्कची विक्री करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत तसेच जे लोक, संस्था, तसेच समूह राष्ट्रध्वजाचा अवमान करतात, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीची निवेदने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कळवा, अंबरनाथ आणि बदलापूर येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली.

हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

देशाच्या प्रजासत्ताक दिनी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना पहावी लागते. महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971’चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे’. असेही समितीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

( हेही वाचा : प्रजासत्ताक दिन २०२२ : पोलिस, अग्निशमन दलातील ‘या’ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर! )

मोहिमेअंतर्गत प्रबोधन

राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम गेली 20 वर्षे राबवत आहे. या अंतर्गत यावर्षीही ‘ऑनलाईन’ व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, सोशल मिडीया, फलक प्रसिद्धी आदी माध्यमांतून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा ! या मोहिमेअंतर्गत प्रबोधन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.