दिलासादायक! कॅन्सरवर करता येणार मात; शास्त्रज्ञांनी शोधले किमोथेरपीपेक्षा प्रभावी तंत्रज्ञान

देशभरात अनेकजण कर्करोगाचा सामना करत आहे, या रोगाच्या उपचारांसंदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आलेली आहे कारण शास्त्रज्ञ कर्करोगग्रस्तांच्या उपचारांसंदर्भात नवी चाचणी करत आहे. ही चाचणी यशस्व झाल्यास कर्करोग उपचारासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होईल.

( हेही वाचा : आकाशात विमानांची जोरदार धडक! अपघाताची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद)

नवे तंत्रज्ञान विकसित 

कर्करोगाचे उपचार प्रभावी परंतु अत्यंत वेदनादायी असतात, पहिल्या स्टेजमध्ये क्वचित एखाद्या व्यक्तीला यासंबंधित माहिती मिळते. मुख्यत: दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये असताना कर्करोगाची माहिती मिळते पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. या जीवघेण्या आजारावर आता उपचार करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून विशेष आणि सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यास आता यश येत असून लवकरच कर्करोगावर उपचारासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

‘CRISPR जीन एडिटिंग टेकनिक’

शास्त्रज्ञांनी संशोधन करताना पहिल्यांदाच ‘CRISPR जीन एडिटिंग टेकनिक’ चा वापर केला जाणार आहे. या प्रक्रियेद्वारे मानवाच्या शरीरात gene इंसर्ट केले जातील, जीन इंसर्ट केल्यामुळे इम्यून सेल्स कॅन्सर पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करण्याचे काम करणार आहे. यामुळे कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. CRISPR या तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्करोगाच्या पेशींमध्ये होणारे बदल सहज ओळखता येतील. रोगप्रतिकारक पेशींना योग्य दिशा देण्याचे काम हे तंत्रज्ञान करते. CRISPR जीन एडिटिंग तंत्रज्ञान कर्करोगावर अत्यंत प्रभावी ठरणार असून कर्करोगाच्या पेशी ओळखणं आणि त्यावर उपचार करणं यामुळे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here