ऐकावे ते नवलच…रिसर्च सांगतो, गांजा कोरोनावर प्रभावी ठरतोय!

जर्नल ऑफ नेचर प्रोडक्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार, कॅनाबिस कंपाऊंड म्हणजेच गांजा हा कोविड 19 ला रोखण्यासाठी प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. गांजा हा कोरोना व्हायरसला निरोगी पेशींमध्ये जाण्यापासून रोखत असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.

कोरोनाशी लढण्यास सक्षम

गांजमध्ये आढळणारे कॅनाबिगेरोलिक ऍसिड ( CBGA) आणि कॅनाबिडिओल ऍसिड (CBDA)हे दोन घटक कोरोनाशी लढा देण्यास सक्षम आहेत, असं ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितलं आहे. या अभ्यासानुसार, माणसाला संक्रमित करण्यासाठी कोरोना विषाणूच्या हल्ल्याला परतवण्याचं काम गांजाच्या या घटकांनी केले आहे.

प्रभावी चाचणी करण्यात आली

संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या अल्फा आणि बीटा प्रकारांविरूद्ध या घटकांच्या प्रभावाची चाचणी केली. या अभ्यासात मानवांना पूरक आहार देणे किंवा गांजा ओढत नसलेल्या लोकांच्या कोरोना संसर्गाची तुलना करण्यात आलेली नाही. गांजा फायबर, अन्न आणि प्राण्यांच्या खाद्याचा एक स्त्रोत आहे आणि अर्क सामान्यतः सौंदर्यप्रसाधने, बॉडी लोशन आणि खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जातं.

( हेही वाचा: बापरे! सामान्यांसोबत लोहमार्ग पोलिस कर्मचारीही अपंग डब्यातून करतात प्रवास )

उपचार करण्याचीही क्षमता

ओरेगॉन स्टेटच्या ग्लोबल हेम्प इनोव्हेशन सेंटरचे संशोधक रिचर्ड व्हॅन ब्रीमेन म्हणाले, गांजामधील हे घटक तोंडावाटे घेतले जाऊ शकतात आणि मानवांमध्ये या घटकांच्या सुरक्षित वापराचा दीर्घ इतिहास आहे. गांजामध्ये आढळणा-या या दोन घटकांमध्ये SARS-CoV-2 संसर्ग रोखण्याची आणि त्यावर उपचार करण्याची क्षमता आहे, असं त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here