धुळ्यातील आदिवासी भागातून विक्री होणारा गांजा खरेदी करून विकणाऱ्या टोळीचा डोंबिवली मानपाडा पोलिसांनी उलगडा केला आहे. या टोळीतील डोंबिवलीत राहणाऱ्या आनंद शंकर देवकर या आरोपीकडून 3 लाख 10 हजार 500 रुपयाचा माल हस्तगत केला. हा इसम विद्यार्थ्यांना गांजाचा पुरवठा करीत असे.
मुख्य आरोपी फरार
डोंबिवली पूर्वेकडील रामनगर रोड येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर, तसेच धुळे शिरपूर येथे राहणारा रेहमल पावरा, संदीप पावरा यांना अटक केली असून यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे. एक इसम अमली पदार्थ घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना खास सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस हा इसम पदार्थांची विक्री करणार असल्याचेही समजले होते. त्यानुसार सापळा रचल्यानंतर एक इसम मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतले असता 20 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्यानंतर तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यातील मुख्य आरोपी फरार आहे.
( हेही वाचा : मुख्य सचिवांना नियम आठवले नाहीत, हे वागणं योग्य? न्यायालयाने सरकारला फटकारलं! )
पोलिसांचे आवाहन
याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे की, या पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा पिताना आढळून आले तर त्वरित ९८२३२२४५८४ किंवा ९९२२९९८६९८ या क्रमांकाला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community