मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डिव्हायडर तोडून टेम्पोवर धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगावजवळ कार आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. मध्यरात्री टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या क्रेटा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार टेम्पोला धडकल्याने भीषण अपघात झाला.

(हेही वाचा – झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देऊन, तरूणाने उडवली पोलिसांची झोप)

भरधाव वेगात असलेली क्रेटा कार डिव्हायडर तोडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोघं गभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावरील काही फोटो समोर आले असून या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा मुंबईहून गुजरातकडे जाणारी क्रेटा कार डिव्हायडर तोडून चालत्या टेम्पोला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. या मार्गावरील ८२ ब्लॅकस्पॉटकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत असल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here