दादर शिवसेनाभवनाजवळ चालत्या गाडीला भीषण आग; परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

119

दादर परिसर हा मुंबईतील मध्यवर्ती भाग असल्याने या भागात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. ऐन गर्दीच्या वेळी दादर सेनाभवन भागात एका वॅगनार गाडीने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि सध्या संपूर्ण रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्री कार्यालयातून फोन; …अन् ‘त्या’ सहा तरुणींना मिळाले ‘सुरक्षा कवच’)

सेनाभवन परिसरात वॅगनार गाडीला भीषण आग 

शिवसेनाभवन जवळ वॅगनार गाडीला भीषण आग लागली असून यात गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात ही भीषण आग लागल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. दुपारी ३.३० च्या सुमारास या वॅगनार गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा आणि वाहतूक पोलीस दाखल झाले.

गाडीने पेट घेतल्यावर हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, यामुळे या भागात सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माहिमच्या दिशेने आणि प्लाझा कडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या गाडीतील गॅसचा सुद्धा स्फोट झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. आता सेनाभवन रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवण्यात आले असून प्लाझा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येईल असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.