फक्त चांगली कार असून उपयोग नाही, तर कार चालवताना आनंद देखील मिळायला हवा. ड्रायव्हिंगचं वेगळं थ्रिल असतं. हे थ्रिल द्विगुणित करण्यासाठी आपल्याकडे टॉप डॅशबोर्ड ऍक्सेसरीज (Car Dashboard Accessories) असायला हवेत. आपण आपलं घर कसं सजवतो, तसं आपल्याला कार सजवायलाही मजा येते.
स्वतःची कार असणं हे प्रशस्त मानलं जातं. आणि त्यात चांगले (Car Dashboard Accessories) असतील तर हींदीत म्हणतात ना, ’सोने पे सुहागा’… चला तर जाणून घेऊया, कोणकोणत्या Accessories ने तुम्ही तुमची कार सजवू शकता.
कार फ्लोअर मॅट्स
फ्लोअर मॅट्स ही एक आवश्यक ऍक्सेसरी आहे जी कारच्या फ्लोअरिंगचे धूळ, चिखल आणि आर्द्रतेपासून संरक्षण करते. यामुळे कारचा आतील भाग स्वच्छ करता येतो.(Car Dashboard Accessories)
कार एअर प्युरिफायर
वायुप्रदूषण ही भारतातील प्रमुख समस्या आहे. म्हणूनच कारच्या आतली हवा स्वच्छ आणि ताजी ठेवणे आवश्यक आहे. कार एअर प्युरिफायर आतून धूळ, धूर आणि दुर्गंधी काढून टाकते. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची ऍक्सेसरीज आहे.
ब्लाइंड स्पॉट मिरर्स
ब्लाइंड स्पॉट मिररमुळे तुम्ही सुरक्षितपणे कार चालवू शकता. ही ऍक्सेसरीज कारच्या साईड मिरर्सवर लावली जाते. ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे ड्राइव्ह करुन कोणत्याही अपघाताचा सामना न करता सुखरुप तुमच्या घरी जाऊ शकता.
(हेही वाचा-Nikolai Leskov : रशियन कादंबरीकार निकोलाई लेस्कोव्ह)
डॅशकॅम
ही एक अत्यंत महत्वाची Top Dashboard Accessories आहे, जी सध्याच्या युगात खूपच प्रचलित झाली आहे. डॅशकॅम घेणं अत्यंत जरुरी आहे. हा कॅमेरा डॅशबोर्डवर बसवला जातो. यामुळे कारच्या आतले आणि बाहेरचे दृश्य रेकॉर्ड होते. कुणी, चोरी, तोडफोड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहतो. कोणत्याही अपघाताचा पुरावा ठेवण्यासाठी हा कॅमेरा आजच आणा.
वाचकांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला अपेक्षा आहे की तुमचे समाधान नक्कीच झाले असेल. अशा आणखी माहितीसाठी वाचत रहा हिंदुस्थान पोस्ट…(Car Dashboard Accessories)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community