देशात १० लाखांहून जास्त बनावट क्रमांक असलेल्या गाड्या रस्त्यावर फिरत आहेत. यात बहुतांश ट्रक आहेत. हा आकडा ईशान्येतील रॅकेट एजंटचा पर्दाफाश करणाऱ्या तपास संस्थांच्या हवाल्याने दिला आहे. या रॅकेटमध्ये अनेक RTO अधिकारी-कर्मचारी सामील आहेत. अनेक प्रकरणांत तर एजंट (RTO Agent) केवळ वाहनाच्या फोटोवरून बनावट नंबर देत असल्याचे दैनिक ‘भास्कर’ने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. (RTO Fraud)
(हेही वाचा – International Olympic Day : काय आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे महत्व?)
सर्वेक्षणात केली चासी नंबरची पडताळणी
छत्तीसगड (Chhattisgarh), नागालँड (Nagaland), अरुणाचल (Arunachal Pradesh) व प. बंगालमध्ये याची पडताळणी करण्यात आली. छत्तीसगडमध्ये अशी बनावट नंबर असलेली ८-१० हजार वाहने राजरोस फिरत आहेत. सर्वेक्षणात ५०० हून जास्त गाड्यांचे नंबर, चेसिस, इंजिन नंबर मिळाले. त्या क्रमांकांची टाटा मोटर्स, अशोक लीलँडचे रायपूर येथील शो-रूममध्ये पडताळणी केली असता दोन्ही कंपन्यांकडे ५० वर्षांतील प्रत्येक वाहनाचा ऑनलाइन डेटाबेस आहे. या कंपन्यांनी सर्व नंबरची पडताळणी केली. त्यानुसार या क्रमांकाची वाहने तयार केली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
आरटीओकडे केली खात्री
बिहार सीमेवरील इस्लामपूर उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. ते बनावट वाहन नोंदणी, नंबर, चेसिस नंबर देण्याचे मोठे केंद्र आहे. तेथील आरटीओ एजंट प्रसन्नोजि यांची सर्वेक्षण करणाऱ्या टीमने रोड कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक म्हणून भेट घेतली. तेव्हा एजंट म्हणाला वाहन आणण्याची गरज नाही. फोटो पाठवावेत. काम होईल. छत्तीसगडच्या वाहनाच्या इस्लामपूरमध्ये नोंदणीसाठी ३० हजार लागतील. नवीन क्रमांक, चेसिस नंबर हवा असल्यास १.०५ लाख लागतील. काम न झाल्यास नागालँड, अरुणाचलमधून करून देऊ.
माइल-९ येथील आरटीओ एजंट सुशील कुमार यांना वाहन नोंदणी करण्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, “आधी सगळे होत होते. आता कडक नियम आहे. पण एनओसी मिळेल. इटानगरमध्ये ५८ हजार वाहनांची चुकीची नोंदणी झाली होती. तपासात सगळे कर्मचारी निलंबित झाले. तरीही प्रयत्न करतो. तुमचे काम होईल.” येथील कार्यालयाच्या बाहेर एका जुन्या ट्रकमध्ये नागालँडच्या क्रमांक NL07-AA-4838 लावला जात आहे. टाटा मोटर्समध्ये चौकशी केली. तो नंबर फेक निघाला. NL-07 कोडही तपासल्यावर बनावट होता.
दिमापूर (नागालँड) येथील कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकचा क्रमांक बनावट असल्याचे दिसून आले आहे.
असा मिळतो बनावट चेसिस नंबर
देशभरात कुठेही चोरी झालेल्या वाहनासाठी नवीन नंबर हवा असल्यास तो ईशान्याकडील राज्यात अगदी १-२ दिवसांत मिळतो. ही राज्ये म्हणजे नागालँड, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल असून या राज्यांतील आरटीओ ही कारवाई वेगाने करतात. आरटीओ तत्काळ ऑनलाइन ना हरकत प्रमाणपत्र इतर राज्याच्या आरटीओंना देतात. त्याच आधारे संबंधित आरटीओ पुन्हा नवा नंबर देतात. ही प्रक्रिया १५ दिवसांत होते.
आरटीओ वाहनांच्या अधिकृत कागदपत्राविना एनओसी देऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर आरटीओने वाहनांची व त्याच्या कागदपत्रांची प्रत्यक्षात पडताळणी केली पाहिजे. त्याच्या एक वर्षानंतर आरटीओ गाडी क्रमांक देऊ शकतात. प्रत्यक्षात मात्र केवळ मोबाईलवर फोटो पाहून एनओसी देण्यात येत आहे.
बनावट क्रमांकांमुळे सरकारचे काय होते नुकसान ?
1. चोरीची गाडी बदललेल्या क्रमांकासह ऑनरोड असल्यास जीएसटीचे १८ टक्के नुकसान होते. उदाहरण – १८ चाकी ट्रकची किंमत ५ लाख रुपये व जीएसटी ९ लाख रुपये, असे होते.
2. आरटीओत लाखोंची कर थकबाकी असलेल्या वाहनांना नवीन नंबर मिळाल्याने जुना कर लांबतो. उदाहरण- १८ चाकी ट्रकचा एक वर्षाचा आरटीओ कर ७० हजार रुपये आहे.
3- खराब, अनफिट आणि चोरीच्या वाहनांची खरेदी करून वेगवेगळ्या गाड्यांचे सुटे भाग जोडून (असेंबल) नवीन वाहने, नवीन नंबरसह बाजारात येत आहेत. त्यांची आरटीओमध्ये काहीही नोंद नसते. यातून कराची मोठी हानी होत आहे.
छत्तीसगडच्या रायगड आरटीओने एप्रिल २४ मध्ये वाहन क्रमांक CG13-AE-9683 (ट्रेलर) यास ब्लॅकलिस्ट केले. गाडीचे मालक पवनसिंह यांनी गाडी रायगड आरटीओच्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी केली असल्याचे हायकोर्टात सांगितले. त्यानंतर हे मोठे रॅकेट उघड झाले आहे. (RTO Fraud)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community